
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत सेवाभावी उपक्रम
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने महिला व बाल रुग्णालय, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी ‘माणुसकीचा घास’ या उपक्रमांतर्गत भोजनदान करण्यात आले.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचे वितरण करण्यात आले. अडचणीच्या काळात रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमाला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रणोतीताई निंबोरकर, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, ज्येष्ठ भाजपा नेते रमेश भुरसे, गडचिरोली शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, उपनगराध्यक्ष निखिल चरडे, जिल्हा पदाधिकारी विलास भांडेकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, ज्येष्ठ कार्यकर्ते घनश्याम वाढई, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, सभापती सीमा कन्नमवार, भाजपा शहर उपाध्यक्ष भारती खोब्रागडे, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी साई सिलमवार, ओबीसी आघाडी शहराध्यक्ष दिनेश नवघडे, बूथप्रमुख नरेश हजारे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
या सेवाभावी उपक्रमामुळे रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचा आधार मिळाला. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

