
मंदिर सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी, माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले स्वागत
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा देव तीर्थस्थळाला वाल्मिकी समाज आयोगाचे अध्यक्ष आशु पोहलजी (राज्यमंत्री दर्जा)तसेच मुख्यमंत्री यांचे OSD अनिरुद्ध पालकर यांनी भेट देऊन मंदिरात विधिवत पूजा-अर्चना केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करून कामाची माहिती घेतली.

मार्कंडा देव येथे आगमन झाल्यानंतर भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अनिरुद्ध पालकर व आशु पोहल यांचे स्वागत केले.
यावेळी मंदिराच्या विकासकामांसह परिसराच्या सुशोभीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कंडा देव तीर्थस्थळाचा विकास आणि सौंदर्यीकरण अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी भास्कर बुरे (OBC आघाडी), दिलीप चलाख, जयराम चलाख, शेषराव कोहळे तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.

