
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले न.प. डिजिटल प्राथमिक शाळा, गोकुळनगर, गडचिरोली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका चिलमवार यांचा नगरसेविका साक्षी बोलुवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असून, समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते घनश्याम वाढई, भाजप कार्यकर्ते आकाश बोलुवार, साईनाथ बोदलकर, तसेच शाळेतील शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

