
एटापल्ली:- दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी क्रांतिवीर शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या १६८ व्या शहीद दिनानिमित्त एटापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात पारंपरिक पूजा विधी करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

२१ ऑक्टोबर १८५८ रोजी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्य, त्याग आणि संघर्षाचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्यांच्या महान बलिदानातून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाने आपली संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच समाजाच्या एकतेसाठी कार्य करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी गोटूल समिती एटापल्ली, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तालुका शाखा एटापल्ली आणि आदिवासी युवा समिती यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी गोटूल समिती एटापल्लीचे अध्यक्ष अक्षय पुंगाटी, डी. एम. पुंगाटी सर, आदिवासी युवा समितीचे अध्यक्ष शुभम रापंजी, किशोर कांदो, लोकनाथ गावडे, अर्जुन हिचामी सर, सुरेंद्र मडावी सर, उज्वल मडावी, दिलीप वड्डे, संतोष हिचामी, एम. मडावी सर, भिवाजी मडावी सर, भिवाजी कुळयेटी सर आदींसह बहुसंख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

