प्रलय सहारे भेंडाळा प्रतिनिधी
भेंडाळा
स्थानिक भेंडाळा गावात पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, गेल्या अवघ्या एका महिन्यात तब्बल चौथ्यांदा नळाच्या पाण्यात ‘नारू’ (संसर्गजन्य जंत) आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर नारू सतिश बोलीवार यांच्या घरी आढळून आलेला आहे , या गंभीर प्रकाराबाबत ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामसेवकाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. नळाच्या दूषित पाण्यामुळे संपूर्ण गावात तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावात पुरवठा होणाऱ्या नळाच्या पाण्यात एकाच महिन्यात चार वेळा नारू सदृश जंतू आढळल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोताच्या शुद्धीकरणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी या आरोग्याशी संबंधित गंभीर बाबीकडे ग्रामसेवकाचे लक्ष वेधले. मात्र, वारंवार सांगूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना किंवा पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. पर्याय नसल्याने ग्रामस्थांना हेच दूषित पाणी वापरावे लागत असून, यामुळे गावातील लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नारू (Guineaworm) किंवा तत्सम जलजन्य जंतूंमुळे शरीरावर गंभीर आजार, ताप आणि असह्य वेदना होण्याचा धोका असतो. एका बाजूला मटण मार्केटमधील घाणीचे साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला थेट पिण्याच्या पाण्यातच जंतू आढळत असल्याने भेंडाळा गावात मोठ्या साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व भीती पसरली आहे.
ग्रामसेवकाच्या या बेजबाबदार आणि सुस्त कारभारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून तात्काळ पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य टाकीचे व विहिरीचे तात्काळ टीसीएल (ब्लिचिंग पावडर) टाकून शुद्धीकरण करावे. गावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून अहवाल जाहीर करावा तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकावर कडक प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे