
भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ रक्तदात्यांचे रक्तदान
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली : जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे, सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तसेच गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, मोफत आरोग्य तपासणीसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिक, युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळपासूनच उत्साहपूर्ण वातावरणात झाली. शहर व तालुक्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेत रक्तदान केले. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत रक्तदात्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
यासोबतच आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन यासह आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न करता रक्तदान, आरोग्यसेवा आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे समाजात सेवाभाव, एकोपा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट झाली. युवकांनीही अशा विधायक उपक्रमांत सहभागी होण्याची प्रेरणा घेतली.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या सामाजिक कार्यातून निर्माण झालेली ही सेवाभावी परंपरा भविष्यातही अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अॅड. दुशांत नामदेव किरसान, नगरसेवक सतीश विधाते, कुसुमताई अलाम, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, जीवन नाट, समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, उत्तम ठाकरे, शरद पाटील ब्राह्मणवाडे, परसराम टिकले, दिलीप घोडाम, अनिल कोठारे, अब्दुल पंजवानी, विजय लाड, सुशील शहा, प्रभाकर वासेकर, विकास जेंगठे, शंकरराव सालोटकर, मनोज आखाडे, देविदास देशमुख, श्यामभाऊ नन्नावरे, संदीप भैसारे, पंढरी चौके, आदित्य सूर्यवंशी, मयूर दोडके, स्वप्निल बेहेरे, विजय राऊत, सुधीर बांबोडे, पुरुषोत्तम चिंचोळकर, रमेश मानकर, नागोराव उईके, पांडुरंग घोटेकर, सुभाषभाऊ कोठारे, घेऊन मेश्राम, अनिल किरमे, मनोज बोरकर, मुन्ना सिंग चंदेल, माधवराव गावळ, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, रीता गोवर्धन, कविता भगत, मीनल चिमूरकर, मनीषा खेवले, विनोद कुंभारे, सुभाष कुकुडकर, अखिल गेडाम, गिरीधर तितराम, प्रभाकर तुलावी, भूषण भैसारे, विलास चीजगरे, संजय बुरांडे, देवाजी काटवे, कुणाल आभारे, सुधीर चौधरी, समीर कुळे, साहिल कुळमेथे, आकाश कुंभरे, अमर नवघडे, पवन नवघरे, विजयानंद महाराज रोडे, नदीम नाथानी, रवी मेश्राम, संजय शिंपी, ज्ञानेश्वर पोरटे, हरबाजी मोरे, रमेश कोठारे, साहिल वडेट्टीवार, गौरव एनपरेडडीवार, विपुल एलटीवार, सुधीर बांबोळे, अविनाश बांबोळे, जावेद खान, लालाजी सातपुते, स्वप्निल मुरस्कर, अशोक नैताम, कुणाल म्हशाखेत्री, चैतन्य उईके, योगेंद्र झंजाळ, निकेश कामीडवार, श्रीनिवास ताडपल्लीवार, वामनराव सावसागडे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि मोफत आरोग्यसेवेच्या माध्यमातून महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीचा अनोखा आयाम मिळाला.

