
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
वडसा,दि.२४ जूलै : देशभर गाजत असलेल्या कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटी, आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने वडसा येथे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

आंदोलनात महेंद्र ब्राह्मणवाडे,जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, माजी सभापती परसराम टिकले, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले (देसाईगंज), मिलिंद खोब्रागडे (आरमोरी), मनोज अग्रवाल (कोरची), मनोज ढोरे, शालुताई दंडवते, धनपाल मिसार, जयमाला पेंदाम, विकास प्रधान, आरती लहरी, नितीन राऊत, श्याम उईके, दिलीप घोडम, मनोहर निमजे, सागर वाढई, ऋषी बगमारे, टोमेश्वर बगमारे, अक्षय बागडे, नंदू चावला, हंसराज लांडगे, कैलास वानखेडे, आक्रोश शेंडे, परशुराम ठाकरे, अमर भर्रे, साजन मेश्राम, संजय करानकर, मेघराज बुराडे, सुरेश तोडफोड, आशा दहिवले, रूपलता बोदेले, वैष्णवी आकरे, होमराज हारगुडे, आनंदशिंग चावला, प्रशांत अंकमवार, भास्कर कन्नाके, व्यंकट पेंदाम, योगेश नेवारे, श्रीरसागर शेंडे, प्रमोद मेश्राम, सागर बनसोड, श्रीकांत सूर्यवंशी, अंगराज बुद्धे, डोमाजी दिवठे, लुनकरण चौधरी, कमलेश बारस्कर, जावेद कुरेशी, ताजूल उके, दुर्वास नाईक, अनिल कोठारे, संजय कोसरे, विलास बुराडे, शैलेश बगमारे, जितेंद्र चौधरी, गजानन घरत, चारुदत्त राऊत, राहुल खरकाटे, धर्मेंद्र लाडे, कुंदन बोदेले, देवानंद सहारे, पराग लांजेवार, संकेत रामटेके, निलेश दुपारे, अथर्व राणे, देवनाथ सयाम, विशाल मेंढे, योगेश ढोरे, रुपेश टिकले, शैलेश येलगंधवार, रमेश चौधरी, विशाल मसराम, मिथुन मेश्राम, गजू नाईक, राजकुमार मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली. आंदोलन शांततेत पार पडले.

