
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.१९ जूलै:
गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. 19 जुलै 2026 रोजी विद्यार्थी व युवकांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता सुमानंद सभागृह, गडचिरोली येथे संपन्न होणार आहे.

ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना दर्जेदार अभ्यास साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देणे, त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यापूर्वी स्पर्धा परीक्षा पुस्तकांसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी 9.00 वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या सामाजिक उपक्रमास यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

