
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिर
गुप्त माहितीवरून मसोली फॉरेस्ट नाक्यावर नाकाबंदी; चालक पसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल*
कोरची, दि. 22 जून 2026: अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कोरची पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत 7 लाख रुपयांचा अवैध दारू साठा व वाहतुकीसाठी वापरलेली XUV गाडी जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22/06/2026 रोजी देवरी मार्गे मसोली ते कोरची मार्गाने पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अवैध दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मसोली फॉरेस्ट नाका येथे नाकाबंदी करण्यात आली.
पोलिसांना पाहताच संशयित वाहनचालकाने वाहन कॅनाल रोडकडे वळवून पळ काढला. पोलीस पाठलाग करत असतानाच चालकाने महिंद्रा XUV 500 गाडी क्रमांक MH-25 R-8499 तिथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
गाडीची झडती घेतली असता काळ्या कपड्याखाली लपवून ठेवलेल्या 10 खड्यांच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या व्हिस्कीच्या 1000 सिलबंद बाटल्या आढळून आल्या. 2 लाख रुपये किमतीचा दारू साठा व 5 लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि मुकुंद देशमुख करत आहेत.
ही कारवाई SP एम. रमेश, अप्पर SP गोकुळराज, अप्पर SP कार्तिक, SDPO रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शैलेंद्र ठाकरे, सपोनि मुकुंद देशमुख व त्यांच्या पथकाने केली.

