
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/चामोर्शी दि.१२ जून:
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी तसेच महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी चामोर्शी येथील महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सदिच्छा भेट घेऊन संवाद साधला. यावेळी मतदार नोंदणीचे महत्त्व, जास्तीत जास्त पात्र मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन तसेच विविध स्थानिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कोवासे, प्राचार्य शमशेरखान पठाण, प्रमोद भगत तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे,जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकुर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अजय लोंढे,संजय लोणारे,दिगांबर धानोरकर,कालीदास पाल, विजय लाड, विनोद खोबे,रामदास कुकुडकर, कालीदास बुरांडे, डोमाजी मडावी, संकेत सातपुते यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


