
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची–कुरखेडा मार्गावर पुन्हा वन्यजीवांचा शिरकाव!
बेडगांव घाट परिसरात सायंकाळी साधारण ८ वाजण्याच्या सुमारास ब्रह्मपुरी–कोरची मार्गावरील बससमोर अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, काही नागरिक आपल्या वाहनाने या मार्गाने प्रवास करत असताना रस्त्यालगतच्या झुडपांमध्ये बिबट्याच्या हालचाली दिसून आल्या. परिस्थितीची गंभीरता ओळखून वाहन चालकांनी तत्काळ आपली वाहने थांबवून सावध भूमिका घेतली.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा बिबट्या सुरुवातीला झुडपांमध्ये दबक्या हालचाली करत होता, मात्र काही वेळातच तो थेट रस्त्यावर आला आणि वाहनांच्या समोरून फेरफटका मारू लागला. त्यामुळे उपस्थित चालक आणि प्रवाशांची धाकधूक वाढली.
सुमारे अर्धा तास बिबट्याचा परिसरात वावर सुरू होता. या दरम्यान काही काळ वाहतूकही मंदावली होती.

दरम्यान, काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ कैद केला असून, त्यामध्ये बिबट्या रस्त्याच्या कडेला फिरताना आणि वाहनांसमोरून जाताना स्पष्ट दिसत आहे. बसमधील महिला-पुरुष प्रवाशांमध्ये यामुळे मोठी चर्चा रंगली.
वनक्षेत्रालगतच्या भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषतः रात्री प्रवास करताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जा

