
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत आयोजन; डोळे, कान, नाक, घसा तपासणी व औषधोपचार मोफत
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन अंतर्गत ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून पोलीस स्टेशन कोरचीच्या वतीने शुक्रवार, दि. 12 जून 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन कोरची चे भव्य आवारात
नागपूर येथील तज्ज्ञ व नामांकित डॉक्टरांमार्फत नागरिकांची डोळे, कान, नाक, घसा व इतर सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.

पोलीस स्टेशन कोरची हद्दीतील सर्व नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रविंद्र भोसले, पोलीस निरीक्षक मा. शैलेंद्र ठाकरे, सहा. पो. नि. मा. मुकुंद देशमुख, पोउपनि मा. योगेश पवार, पोउपनि मा. नागेश टेकाम व सर्व कर्मचारी वृंद पोलीस स्टेशन कोरची यांनी केले आहे.

