
अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
सोन्याचे दागिने साफ करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा वरोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.दि ०२/०६/२०२६ रोजी सरदार पटेल वार्डातील नथ्थु साधुजी दडमल (वय ६२ वर्ष) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्री फिरवून चंद्रपूर येथून तीन आरोपींना ताब्यात घेऊन वेड्या ठोकले आहेत. वरोरा येथील सरदार पटेल वार्डातील नथ्थु दडमल यांची सोन साखळी स्वच्छ करून देण्याच्या पाहण्याने २ जून रोजी फसवणूक करण्यात आली होती. त्यांच्या घरी दोन अनोळखी ईसम येवुन त्यांना चांदी, तांबा, साने यांचे भांडे चमकवुन देतो असे म्हणुन फिर्यादी यांचे गळयातील सोण्याचा गोफ वजन १५ ग्राम किंमत अंदाजे १,५०,००० रुपये चमकवविण्या करीता दिलेला असता त्यांनी हात चलाकी करुन फिर्यादी यांना घरामध्ये गॅसवर डबा ठेवण्याचा बहाण करुन फिर्यादीचा फिर्यादी यांचे गळयातील सोण्याचा गोफ घेवुन गेलेले होते. या संदर्भातील तक्रारीनंतर पोलीस स्टेशन वरोरा येथे अप.क.७२१/२६ कनम ३१८ (४) बी. एन. एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के याचे मार्गदर्शनात डी. बी. पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोहवा नितीन रायपुरे ,सुकराज यादव, पो.अ.विशाल राजुरकर , पोका सौरभ कुलये , पो.अं. मनोज ठाकरे यांनी तपासाची चक्रे फिरवुन पो.स्टे. परीसरातील सी.सी.टि.व्ही फुटेजची शहरात पाहनी केली. वरोरा शहरातील १०० चे वर दुकाणचे व घरांचे तसेच चंद्रपुर शहर व परीसरातील १०० चे वर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक केले असता आरोपी हे चंद्रपुर शहरातील एका भागामध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वरोरा पोलिसांनी आरोपींच्या हालचालीवर दोन दिवस पाळत ठेवुन आरोपी खोलीमध्ये येताच अतिशय शिताफिने तिन आरोपीतांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टेशन वरोरा येथे आणुन गुन्हयाचे बाबत विचारपुरा केली असता त्यांनी वरोरा, बल्लारशहा, सावली, घुग्गुस, राजुरा येथे व ईतर जिल्हा बाहेर सुध्दा गुन्हे केले असल्याची कबुली दिली. यानंतर आरोपी मो. आरिफ मो. बरखत अली वय ४२ वर्ष, निर्दोष बद्रीप्रसाद गुप्ता दोन्ही रा. मधुरापुर ता. बिहपुर जि. भागलपुर, बिहार. आणि पंकजकुमार सुखदेव शाहा वय ४३ वर्ष रा. जमुनिया ता. नवगछिया जि. भागलपुर राज्य – बिहार यांना अटक केली. तसेच आरोपींच्या ताब्यातुन सोण्याचा गोफ (१५ ग्राम वजन) १,५०,००० रु., सोण्याचे दोन डोरले मणी, कानातले दोन वजन अ.५ ग्राम किंमत ५०,००० रु. ,चार सोन्याची अंगठी वजन अदाजे २० ग्राम( २,६०,००० रु.) सोन्याचे दोन डोरले वजन ५ ग्राम कि. ६०,००० रु., आरोपींनी गुन्हयामध्ये वापरलेल्या दोन मोटार सायकल किंमत १,००००० रुपये. असा एकुन ६,२०,००० रुपयांचा मुददेमाला हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक,अप्पर पोलिस अधिक्षक , अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शना खाली वरोराचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली.


