
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली,दि.८ जुन:
वडसा रेल्वे स्टेशन परिसरातील LHS-59 अंडरपास बोगद्याच्या रस्त्याची दुरुस्ती 10 जून 2026 पासून सुरू होणार असल्याची लेखी हमी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
यामुळे 09 जून रोजी प्रस्तावित ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जनतेच्या समस्यांच्या निराकरणासाठी आमदार रामदास मसराम यांचा पाठपुरावा पुढेही कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.


