
नगरसेवक तुकाराम गुरुनुले यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गांधी चौक मूल येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा..

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी..
मूल !

नगरसेवक श्री. तुकाराम गुरुनुले यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गांधी चौक, मूल येथे बालगोपाल व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी मा. नगराध्यक्षा सौ. एकताताई समर्थ, नगरसेविका सौ. ज्योतीताई चटारे, मा.किरण गावतुरे सर , प्रा. विजय लोणबले सर , दत्तात्रय समर्थ जिल्हाध्यक्ष इंटक , चेतन कामडे जिल्हाउपाध्यक्ष इंटक , मिथुनसिंग पटवा युवक काँग्रेस मूल शहर अध्यक्ष , मोरेश्वर लोणबले सामाजिक कार्यकर्ते आणि विकास निकोडे उपस्थित होते.
वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक, पेन व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त आधारित गीत सादर करून नगरसेवक तुकाराम गुरुनुले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या शुभेच्छांनी हा वाढदिवस आनंददायी व संस्मरणीय ठरला.
NEWS JAGAR CHANDRAPUR DISTRICT…

