
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली ,दि.५ जुन:
गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा संदर्भात आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली यांना गडचिरोली शहरातील पाणीटंचाईवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा ज्येष्ठ नेते भारत खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


