Nagbhid land surveyor caught in ACB trap.

अरुण बारसागडे, उपसंपादक, न्युज जागर
घरच्या जागेचे फेरफार करून देण्यासाठी लाचेची मागणी करत स्वीकारणाऱ्या येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक रंजीत रामचंद्र कनोजकर Ranjit Ramchandra Kanojkar व एका खाजगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केली. या घटनेने नागभीड तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.तक्रारदारास आजोबांच्या नावाने असलेल्या घराच्या जागेचे वडिलांचे नावाने फेरफार करावयाचे होते. यासाठी तक्रारदाराने अर्जही दिला होता. मात्र या कामाकरीता भूकरमापक रंजित कनोजकर याने १५ हजार रुपयांची मागणी केली. परंतू तक्रारदारास ही लाच द्यायची मूळीच इच्छा नसल्याने त्यांनी
४ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय चंद्रपुर येथे प्रत्यक्ष हजर राहून तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने तक्रारदार यांना त्यांचे आजोबाचे नावाने असलेल्या घराच्या जागेवर वडीलांचे नावाने फेरफार करण्याचे कामाकरीता तडजोडीअंती १० हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली व खाजगी व्यक्ती जयंत दिपक कामडी रा. तळोधी याचेकडे लाचेची रक्कम देण्यास सांगीतले. यावरून तक्रारदाराने आरोपी जयंत कामडी यांचेकडे १० हजार रूपये दिले असता त्यांनी ती लाच रक्कम स्विकारताच रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले. तसेच भूकरमापक रंजित कनोजकर यालासुद्धा ताब्यात घेण्यात आले. ही कारवाही पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांचे मार्गदर्शनात उप अधीक्षक अनिल जिल्हावार, पोलीस निरीक्षक सविन धर्मेजवार व सापळा पथक पोहवा रविकुमार इंगळे, पोशि अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, सचिन गजभिये, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, सतिश सिद्दाम, बापोशि संदिप कौरासे यांनी केली. Nagbhid land surveyor caught in ACB trap.

#Nagbhid
#acb trap

