
हळदवाही-रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रात घरोघरी जनसंपर्क; महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन

नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकरजी कोहळे यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन करत हळदवाही-रेगडी जिल्हा परिषद क्षेत्राचे पदवीधर प्रमुख तथा भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी संपूर्ण क्षेत्रात झंझावाती दौरा केला.

या दौऱ्यादरम्यान सुरेश शहा यांनी हळदवाही, हळदवाही टोला, मंजेगाव, मक्केपल्ली, माल मकेपल्ली, चेक नंबर १, माडे, मुधोली, पावी, मुरुंडा, माडेआमगाव, रेगडी, विकासपल्ली आदी गावांना भेटी दिल्या. गावोगावी पदवीधर मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांनी प्रत्यक्ष जनसंपर्क साधला. यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकरजी कोहळे यांना प्रथम पसंती देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला गती
पदवीधर मतदारांपर्यंत महायुतीची भूमिका पोहोचविणे, मतदारांशी थेट संवाद साधणे आणि उमेदवाराच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, या उद्देशाने हा दौरा करण्यात आला. गावागावांत संपर्क साधून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यावर यावेळी भर देण्यात आला.
सुरेश शहा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या जनसंपर्क मोहिमेमुळे हळदवाही-रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे.
या प्रचार दौऱ्यात तारक हलदार, सोम वैद्य, अजय पुडो, देवनाथ भोवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार सुधाकरजी कोहळे यांना विजयी करण्यासाठी गावोगावी जनसंपर्क आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भाजप कार्यकर्त्यांनी भर दिला आहे.

