
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली दि,१ जुन:
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल यांनी, तर भाजपकडून अरुण लाखानी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
भाजप उमेदवार अरुण लाखानी यांच्या नामांकनावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह स्थानिक आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

दुसरीकडे काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्या नामांकनावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खा. प्रतिभा धानोरकर , शिवसेनेचे उबाठा गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदिप गिरे उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षातील उमेदवारांनी विजयाचा आशावाद व्यक्त केला.

