
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.२० एप्रिल:
आज दि. २० एप्रिल रोजी जिल्हा परिषद गडचिरोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या दालनात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा चामोर्शी येथील नवोदय परीक्षेत पात्र ठरलेल्या दोन विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रेरणादायी कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये शिक्षणाधिकारी ,बि.डी.ओ.पोळ,बि.ई.ओ.आखाडे ,केंद्रप्रमुख वरपडे,मुख्याध्यापिका कोंडावार तसेच वर्गशिक्षक पोटवार उपस्थित होते.या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी चामोर्शी तालुक्यातील नवोदय परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे शाळेचा, शिक्षकांचा आणि संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढला असून भविष्यातही विद्यार्थी अशाच प्रकारे उत्कृष्ट यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

