
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१९ एप्रिल:
चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम जवळील वसंतपूर येथे सार्वजनिक श्री श्री राधाकृष्ण मंदिर वसंतपूर येथे येथील स्थानिक बंगाली समाजाच्या वतीने 33 वा 16 प्रहर अखंड महानाम यज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले.
या आयोजनानिमित्त आयोजन कमिटीच्या विशेष निमंत्रणावरून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांनी सदिच्छा भेट दिली व या ठिकाणी दर्शन घेतले व काही वेळ येथील तारक तारकब्रह्म महानाम यज्ञाचा रसपाण केला उपस्थित बंगाली बांधवांसोबत संवाद साधला सदर आयोजन गेल्या अनेक वर्षापासून अविरत करण्यात येत आहे.

या आयोजनानिमित्त या भागातील तमाम बंगाली बांधवांचा स्नेहमिलन होत असतो व या आयोजना निमित्त संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांकरिता महाप्रसाद व खिचडी वाटप करण्यात येते व या ठिकाणी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील बंगाली बांधव मोठ्या उत्साहाने उपस्थित राहतात व येथील महानाम यज्ञाचा लाभ घेतात यावेळी उपस्थित बंगाली बांधवाना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी मार्गदर्शन केले व या ठिकाणी महाप्रसाद व खिचडी चा लाभ ग्रहण केला.
यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आसूटकर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, संघटन नेते मास्टर प्रवीण गेडाम. व श्री श्री राधाकृष्ण मंदिर वसंतपूर येथील अध्यक्ष मनोज दास,उपाध्यक्ष दिनेश मंडल सचिव अबोनी राय, सहसचिव कुमारेश मंडल, कोषाध्यक्ष अनुप विश्वास, सह कोशाध्यक्ष प्रभात हलदार, भंडारी दुर्जन सरकार रामपद मंडल व बंगाली समाज प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

