
नितेश गट्टीवार गडचिरोली/अहेरी दि.१४ एप्रिल:
स्थानिक कन्याका मंदिर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली.
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या विकासात्मक दूरदृष्टी,कार्यकुशलता आणि युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून मरिगुडाम व कमासूर येथील शेकडो नागरिकांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सर्व नवीन कार्यकर्त्यांचे दुपट्टा परिधान करून स्वागत केले तसेच त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुका अध्यक्ष विकास तोडसाम, महिला महामंत्री शालिनीताई पोहणेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तारमारे,जिल्हा सचिव अभिजित शेंडे,नगरसेवक आशिष पीपरे,विकास उईके,अमोल गुडेल्लीवार अहेरी तालुक्यातील विविध गावांमधून शेकडोच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

