
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी :
चामोर्शी येथे भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चामोर्शी पोलिस स्टेशनच्या वतीने दि.१४ एप्रिल रोजी शिस्तबद्ध रूट मार्च तसेच दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
सदर उपक्रमाचे नेतृत्व चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांनी केले. डोंब यांच्या उपस्थितीत सोमवारला शहरातून रूट मार्च काढण्यात आला.

रूट मार्चची सुरुवात शहरातील वाळवंटी चौक येथुन होऊन आंबेडकर वार्ड,बस स्टाप,जि.प.शाळा, शारदा राईस मिल, आष्टी टी पाईंट, लक्ष्मी गेट,सराफा बाजार मार्ग नगरपंचायत मैदानापर्यंत करण्यात आली.या मार्गावर पोलिसांनी शिस्तबद्ध संचलन करत नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेबाबत जागरूक केले.
त्यानंतर नगरपंचायत मैदानावर दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
या संपूर्ण उपक्रमात ८ पोलीस अधिकारी,२८ पोलीस अमलदार तसेच ५१ होमगार्ड सहभागी झाले होते.

