
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.१४ एप्रिल:
जिल्ह्यात ठिकठिकाणी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.चामोर्शी येथे स्वाभिमानी सामाजिक संघटनेच्या वतीने आज दि.१४ एप्रिल रोजी लक्ष्मी गेट चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून ये-जा करणाऱ्या नागरीकांना लिंबू सरबतचे वितरण करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू धोडरे,अरूण गव्हारे, माजी नगरसेवक विजय शातलवार,कालिदास बुरांडे, रमेश एडलावार, विनोद पेशट्टीवार, यशवंत त्रिकांडे, प्रकाश सहारे, विक्की वालदे यांचेसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.यशस्वितेसाठी सर्व सदस्यांनी सहकार्य केले.


