
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.९ एप्रिल:
एनएसयुआय प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांच्या सूचनेनुसार तसेच गडचिरोली एनएसयुआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली, एन. एस. यु. आय. स्थापना दिनानिमित्त दि. ९ एप्रिल रोजी धानोरा तालुका एन. एस. यु. आय. तर्फे मोहगाव येथे 500 मीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला तसेच क्रीडा क्षेत्राबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमातून साध्य करण्यात आला.

यावेळी वेळी एन. एस. यु. आय.चे तालुका अध्यक्ष अरविंद मडावी, तालुका उपाध्यक्ष करण गावडे, मुख्याध्यापिका बड्डा मॅडम, पेंढरी येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी एस. एस. केकरे, आरोग्य सेविका ए. आर. सिडाम, आशा वर्कर धनायबाई टेकाम, ग्रामपंचायत मोहगावचे शिपाई नाजुकराव आतला, दयाराम हलामी व लोमेश गावडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन धानोरा तालुका एन. एस. यु. आय.च्या कार्यकर्त्यांनी केले.

