
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.६ एप्रिल:
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त गडचिरोली येथे माजी आमदार तसेच भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. कार्यक्रमाला भाजपा ज्येष्ठ नेते व माजी सभापती मारोतराव इचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, कृऊबा संचालक हेमंत बोरकुटे यांच्यासह उमेश उईके, सुरज मडावी, राजू शेरकी, आनंद खोब्रागडे, भास्कर भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या स्थापना दिनाचे महत्त्व सांगत कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. तसेच देशाच्या विकासासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प केला.कार्यक्रम शेवटी राष्ट्रगीताने संपन्न झाला.

