
गडचिरोली,दि.४ एप्रिल:
कुरखेडा तालुक्यातील नवेझरी येथील वेदांत शंकर पदा (वय ८ वर्षे) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ मार्च २०२६ रोजी घडली. वडेगाव येथील क्रांतिवीर नारायणसिंह उईके आदिवासी आश्रम शाळेत दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेला वेदांत तलावात बुडाल्याने मृत्यूमुखी पडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत शाळेजवळील तलावाजवळ गेला असताना ही दुर्घटना घडली.
घटनेनंतर आमदार श्री. रामदास मसराम यांनी ४ एप्रिल २०२६ रोजी वडेगाव येथील आश्रम शाळेला भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान शाळेतील अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. यावेळी त्यांनी प्रकल्प अधिकारी यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा करून सर्व समस्यांची जाणीव करून दिली व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेड़ा जीवन पाटिल नाट, माजी सभापती गिरिधर तितराम, जयंत हरडे, काँग्रेस जेष्ठ नेते जांभूळकर, संजय कोरेटी, माजी नगरसेवक उस्मान पठान, भावेश मुंगनकर, मुख्याध्यापक गिरीपूंजी आदि उपस्थित होते.

