
नितेश गट्टीवार,
गडचिरोली दि.३१ मार्च:
स्नेहधर्म बहुउद्देशीय संस्था, अहेरी जि. गडचिरोली यांच्या वतीने संचालित स्नेहधर्म वृद्धाश्रम व स्नेहधर्म बाळाश्रम यांचे भव्य उद्घाटन आज दि. 31 मार्च 2026 रोजी अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथे उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यमान आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास स्नेहधर्म बहुउद्देशीय संस्था अहेरीच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी युवती जिल्हा अध्यक्षा व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला तहसीलदार बालाजी सोमवंशी, जेष्ठ नेते बबलू भैय्या हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी, सारिकाताई गडपल्लीवार,वनपरिषद अधिकारी हिंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, तसेच राज परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या कार्यात योगदान देणारे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष किसकेंद्राराव बाबा आत्राम, सचिव रामेश्वरराव बाबा आत्राम, सहसचिव सुवर्णा शेडमेक, तसेच सदस्य जगन्नाथ शेडमेक, नारायणराव बाबा आत्राम आणि पद्मिनी आत्राम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुरेंद्र अलोणे यांनी केले.या उपक्रमामुळे परिसरातील गरजू वृद्ध व निराधार बालकांना आधार मिळणार असून समाजातील दुर्बल घटकांसाठी हा एक स्तुत्य व महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

