
नितेश नितेश गट्टीवार गडचिरोली ( चामोर्शी)दि.१ एप्रिल:
चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथील प्रयोगशाळा सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झालेले गणेश कोल्हटवार यांच्या सेवापुर्ती सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शाल श्रीफळ, साडी चोळी व भेटवस्तू देऊन त्यांच्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव गोविंदराव बानबले ,तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे ज्येष्ठ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष डी.एन. चापले, शरद पाटील ब्राम्हणवाडे,प्राचार्य ए.आर. गौरकार,उपप्राचार्य संघमित्रा कांबळे,पर्यवेक्षक श्याम भर्रे तसेच शाळेचे सर्व प्राध्यापक,शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ.पंकज नरुले तर आभार प्रदर्शन राकेश खेवले यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी याचे सहकार्य लाभले.

