khadsangi gram panchayat

चिमूर प्रतिनिधी

खडसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेबाबत काढण्यात आलेल्या नोटिशीवर सरपंचांची स्पष्ट स्वाक्षरी दिसून येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सदर पत्रावर ग्रामपंचायत अधिकारी/सचिव यांची स्वाक्षरी दिसत असून, सरपंचांच्या नावासमोर स्वाक्षरीऐवजी केवळ शिक्का अथवा नोंद दिसत असल्याचे पत्राच्या छायाचित्रावरून स्पष्ट होते.

सदर नोटिशीमध्ये दिनांक ०२/१०/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय खडसंगी येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामसभेत Reform Utsav व People’s Plan Campaign (PPC) तसेच महिला शेतकरी सक्षमीकरण यासंदर्भातील विषय ठेवण्यात आले आहेत. मात्र, या विशेष ग्रामसभेची नोटीस काढताना सरपंचांची स्वाक्षरी नेमकी का नाही, सरपंचांनी नोटिशीला मान्यता दिली होती का, की त्यांनी या प्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवले आहे, याबाबत स्पष्टता उपलब्ध होत नाही.

ग्रामस्थांकडून प्रशासनाला पुढील प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देण्याची मागणी होत आहे—
– विशेष ग्रामसभेची नोटीस कोणाच्या आदेशाने काढण्यात आली?
– नोटिशीवर सरपंचांची स्वाक्षरी का नाही?
– सरपंचांना या विशेष ग्रामसभेची पूर्वकल्पना व माहिती देण्यात आली होती का?
– सरपंचांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला असल्यास त्याचे कारण काय?
– ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवणार?
– सभेतील निर्णय व ठराव अधिकृत इतिवृत्तात नोंदविले जाणार आहेत का?
“ग्रामसभा ही गावकऱ्यांच्या हक्काची लोकशाही प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणतीही शंका राहू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण बाब स्पष्ट करावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, विशेष ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर सरपंचांची भूमिका काय आहे आणि सदर नोटिशीवरील स्वाक्षरीबाबत त्यांचे अधिकृत स्पष्टीकरण काय आहे, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
नागरिकाचे मत
मागील एक महिन्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे त्यात एकूण मागण्या वीस अशा होत्या त्या पैकी एक मागणी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी ही होती. ग्रामसभा बोलावणे ही सरपंच यांच्या हातात असतो तरी पण त्यांनी ग्रामसभा पुन्हा होणार नाही असे प्रोसेडिंग बुक ला आपले मत लिहिले जनतेच्या मागे. हा एक शासकीय कामात डाक्युमेंट हेराफेरी केल्याचा आरोप आहे आम्ही सर्व ग्रामस्थांनी आंदोलन करून विशेष ग्रामसभेची जिल्हा परिषद चंद्रपूर सीईओ यांना पत्रव्यवहार केला व सभा घेण्यात आली.

