
बामणी, दि. १ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विकास विभागाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, बामणी येथे विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध सांस्कृतिक सादरीकरणातून आपली कला व प्रतिभा सादर केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. ए. सुटे सर होते. यावेळी प्राथमिक शिक्षक श्री. जोगे सर, माध्यमिक शिक्षक श्री. शंकर मडावी सर, क्रीडा शिक्षक श्री. किरण कोंढगुर्ले सर तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कला, संस्कृती, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शंकर मडावी सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सेवा संकल्प अभियानातील हा सांस्कृतिक कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

