
आ. बंटी भांगडिया व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट; जिल्ह्याच्या विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा
मुंबई | जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया आणि माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गडचिरोली हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि विविध आव्हानांना सामोरा जाणारा जिल्हा असून, येथील नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच विकासकामांना अधिक वेग मिळणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विकासकामे, स्थानिक गरजा आणि प्रलंबित विषय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. गडचिरोलीतील विकासाचा वेग वाढविण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याबाबतही या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

या भेटीप्रसंगी नगरसेवक सागर निंबोरकर आणि पंकज खोबे उपस्थित होते. गडचिरोलीच्या विकासासाठी मुंबईच्या सत्ताकेंद्रात झालेल्या या भेटीमुळे जिल्ह्यातील विविध विकासविषयक प्रश्नांना शासनदरबारी अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

