
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली दि. ३ ऑक्टोबर : आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांनी टिळक भवन, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच पक्ष संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.

मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासोबतच कार्यकर्त्यांशी समन्वय वाढविणे आणि संघटन अधिक मजबूत करण्याबाबतही विचारविनिमय झाला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार संजय मेश्राम, आमदार धीरज लिंगाडे, आमदार सुधाकर अडबाले आदी उपस्थित होते.


