
बालकांच्या आरोग्य, पोषण व संगोपनातील योगदानाचा गौरव; भाजपाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त

नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी), दि. ३ ऑक्टोबर : समाजातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तळागाळात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या सेवेला सलाम करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपा तालुकाध्यक्षा रोशनी वरघंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रामीण व शहरी भागातील बालकांच्या संगोपनाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.
बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, पूर्वप्राथमिक शिक्षण देणे तसेच पालकांना आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन करणे, अशा विविध पातळ्यांवर त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत सत्काराच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचे कौतुक केले. समाजाच्या जडणघडणीत बालकांचा पाया मजबूत करण्याचे काम करणाऱ्या या सेवाभावी महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला,विद्याताई आभारे,कविताताई किरमे,नरेश अलसावार,
श्रावण सोनटक्के,नीरज रामानुजनवार,तृप्ती चिळंगे,सतीश भांडेकर
जयराम चलाख,भारत धोडरे,कौशल्य बुरांडे,मनीषा बोधनवार,कल्पनाभांडेकर,भारती पटेल,चंदा मेश्राम ,अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

