
*सरपंच संघटना धानोरा यांनी मा. तहसीलदार व मा. गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आले.*
धानोरा – धानोरा तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेला कामांचे कुशल व अकुशल मजुरी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत (उदा. शेत बांधावर वृक्ष लागवड, सिंचन विहीर व इतर). स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाचे देयके मिळणे बाबत. सरपंच व उपसरपंच यांना शासनाकडून मिळत असणारा मानधन (वाढीव थकीत मानधन सह) हा थेट बँक खात्यावर मिळणे बाबत. धानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणे बाबत. पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना च्या लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते मिळणे बाबत. धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते पूर्णतः दुरवस्था असून त्वरित दुरुस्त करण्यात यावे. अशा विविध गावातील ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या समस्यावर निवेदन देऊन चर्चा केले. ह्या समस्या गांभीर्याने सोडवण्यात यावे. करिता निवेदन सादर केले.
यावेळी सरपंच मोहन गावडे, उपसरपंच पुरुषोत्तम बावणे, सरपंच चेतन सुरपाम, सरपंच संजय गावडे, सरपंच प्रदीप उसेंडी, सरपंच उषा शेडमाके, सरपंच पूनम किरंगे, सरपंच नंदा दुगा, सरपंच निरंजना नरोटे, सरपंचा विजया सिडाम आदी उपस्थित होते.

