Korchi news

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरनिय ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशानुसार, गडचिरोली जिल्ह्यातील, अतिदुर्गम कोरची तालुक्याची शिवसेना पक्षाची आढावा बैठक जिल्हा प्रमुख मा.संदिपजी ठाकूर यांचे अध्यक्षतेखाली आज दिनांक २१ मार्च २०२६ रोज शनिवारला संपन्न झाली,कोरची येथे आढावा बैठकीदरम्यान जिल्हा प्रमुख मा.संदीप ठाकूर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. Korchi

कोरची शहरासह तालुक्यातील पायाभूत सुविधेचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना पक्षाचे आमच्या शिवसेनेचे उमेदवार बहुमताने निवडून येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.कोरची तालुक्यातील जनतेला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास त्या खंबीरपणे सोडविण्यासाठी शिवसेना ठामपणे पाठीशी उभी असल्याचे मा.संदिपजी ठाकूर यावेळी म्हणाले. newsjagar
या आढावा बैठकीला मा.राकेश बैस आरमोरी विधानसभा समन्वयक,मा. सत्यपाल परशुराम कुत्तरमारे जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गडचिरोली,मा.रमेश जी उप्पलवार जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गडचिरोली, मा.कृष्णाजी नरडांगे कोरची तालुका प्रमुख, श्री.दीपक नरडांगे युवासेना कोरची तालुका प्रमुख, मा.सौ सुशीलाताई सरपा कोरची महिला तालुका प्रमुख,मा.शंकर साहू तालुका संघटक,या.हेमंत साहू उपतालुका प्रमुख कोरची, अस्वलहुडकी, जामणारा , कोरची, बेतकाठी,बोरी, अल्लीटोला ,बोटेकसा,भिमपुर,सोहले,मसेली,कोटगुल,बेडगांव,कोचिनारा,यासह कोरची तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक आणि कोरची तालुक्यातील सरपंच बहुसंख्येने उपस्थित होते,

