korchi news

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची
नुकत्याच झालेल्या 15 मार्च 2026 रोजी ’अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड’ व ’थिऑसाफिकल ऑर्डर ऑफ सर्विस’ यांच्या संयुक्त विद्यमाने, स्त्री शक्ती जागृती मेळावा आणि हिरकणी पुरस्कार उत्साहात पार पडला. त्यात प्रा. डॉ. सुकेशिनी बोरकर यांना ’हिरकणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार डॉ. स्मिता मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श मंगल कार्यालय, न्यू सुभेदार ले आउट, नागपूर येथे देण्यात आला. यावेळी श्रद्धा ढोमणे पोलीस सायबर क्राईम नागपूर, उद्घाटक नीताताई ठाकरे, म.न.पा. नागपूरच्या महापौर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. आलेल्या 657 प्रस्तावातून 33 हिरकणींची निवड करण्यात आली. शॉल, हिरकणी पुरस्कार,सन्मानचिन्ह, रोपटे, विचारपुष्प, मानपत्र व इतर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
डॉ. सुकेशिनी यांनी आपल्या यशाचे श्रेय सावित्रीबाई फुले, आजी आयु. यशोदा मोटघरे व परिवारातील सर्व सदस्यांना दिले आहे.

