
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
*”आष्टीकरांच्या हक्कासाठी आझाद समाज पार्टीचा आवाज : घंटागाडीची तातडीची मागणी”*
आष्टी:-
आष्टी शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना स्वच्छता सुविधा मिळाव्यात म्हणून आझाद समाज पार्टीतर्फे ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. यात घंटागाडी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

आज सकाळी आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता, पाणीपुरवठा कर्मचारी व एक चपराशी यांना वगळता कोणतेही अधिकारी/कर्मचारी उपस्थित नव्हते. पदाधिकाऱ्यांनी 11:40 वाजेपर्यंत प्रतीक्षा केली, मात्र कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने निवेदन पाणीपुरवठा कर्मचाऱ्याकडे द्यावे लागले.
या वेळी आझाद समाज पार्टीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, निशिकांत भासारकर, कुणाला सुनतकारी, बालू चांदेकर आदी कार्यकते शहरातील उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आष्टीतील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून स्वच्छतेच्या दृष्टीने घंटागाडीची सुविधा ही नागरिकांचा हक्क आहे. प्रशासनाने या मागणीवर तातडीने पावले उचलून घंटागाडीची सोय करावी, असे निवेदनाद्वारे सांगितले आहे.
—————————————-
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

