:- आरमोरी (जि. गडचिरोली) येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोली, शिक्षण विभाग (माध्यमिक) जि.प. गडचिरोली तसेच महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ *गडचिरोली ग्रंथोत्सव २०२५”* या दोन दिवसीय कार्यक्रमाचे दि. १४ मार्च २०२६ रोजी उद्घाटन संपन्न झाले.
या ग्रंथोत्सवाचे *उद्घाटन आमदार मा. श्री. रामदासजी मसराम* यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमास मनोहरभाई शिक्षक प्रसारक मंडळ आरमोरीचे सचिव मनोजजी वनमाळी, कुसुमताई अलाम, प्राचार्य खालसा सर, सहाय्यक ग्रंथालय संचालक नागपूर रामदास साठे, जिल्हा ग्रंथालय संघ गडचिरोलीचे अध्यक्ष जगदीश मस्के, तसेच भावराव पत्रे सर, दीपक बेहेरे, रमकांत वनमाळी, विजय रैवतकर यांच्यासह शिक्षक, ग्रंथालय अधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
