:- आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात फवारा चौक येथे शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
“घरचा गॅस झाला महाग, चुलीची पेटली पुन्हा आग” आणि
“सिलिंडरचे दर गगनाला, फटका बसला खिशाला”
अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयात जाऊन प्रशासनामार्फत केंद्र सरकारला निवेदन देत गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली.
या आंदोलनात काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, माजी सभापती परसराम टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, नगरसेवक राजूभाऊ रासेकर, जिल्हा उपाध्यक्ष आरती लहरी,नगरसेवक शाम उईके, नगरसेविका गुरमीतकौर चावला, नगरसेविका आशा दहिवले, नगरसेविका मंदा समर्थ, जि.प.माजी सदस्य जयमाला पेंदाम, मनोहर खेकारे, कैलास वानखेडे, वैष्णवी आकरे, विलास बनसोड, भूमेश्वर शिंगाडे, परशुराम ठाकरे, दिलीप घोडाम, अनिल किरमे, हंसराज लांडगे, पवन गेडाम, योगेश नेवारे, सुरेश राऊत, प्रमोद मेश्राम,साजन मेश्राम, सुरेश तोंडफोडे, संजय करांकर, धर्मराव नैताम, धीरज तडसे, सुधाकर मस्के, सागर बनसोड, यादव मस्के, नरेश मेश्राम, चारुदत्त राऊत, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचा लढा कायम राहणार.
