गडचिरोली:- क्रांतिकारक शहीद बाबूराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त १२ मार्च २०२६ रोजी शहरात अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली च्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ‘जय सेवा, जय जोहार’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे आणि त्यांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे जननायक बाबूराव शेडमाके यांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोभायात्रेची प्रारंभ वीर बाबुराव शेडमाके चौक येथून सायंकाळी ५ वाजता झाला. या शोभायात्रेत अबालवृद्धांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
यात्रेचा समारोप इंदिरा गांधी चौक येथे झाला, जिथे कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन मडावी साहेब आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोली, प्रमुख अतिथी वसंत कुळसंगे, संस्थापक शहिद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती, डॉ. प्रियंका मडावी, कुणाल कोवे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली, कार्याध्यक्ष बादल मडावी, मुकुंदा मेश्राम, प्रियदर्शन मडावी, गुलाबराव मडावी अध्यक्ष कै. बाबुरावजी मडावी स्मारक समिती, गडचिरोली, वामन जुनघरे, देवराव अलाम, विद्याताई दुगा, नगरसेवक साक्षी बोलूवार, युवासेना लोकसभा सचिव रक्षित पोटवार, सामाजिक कार्यकर्ते आकाश बोलुवार, वामन जुनघरे, विशेष अतिथी डेव्हिड पेंद्राम, रुपेश सलामे, मिडिया जिल्हाप्रमुख अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,गडचिरोली, एटापल्ली तालुका अध्यक्ष ऍड. गिरीश जोगे, चामोर्शी तालुका अध्यक्ष सुमित कुमरे, शहर अध्यक्ष राज कुमरे, शहर कार्याध्यक्ष पराग कन्नाके, शहर सचिव विजय सुरपाम, शहर उपाध्यक्ष अजय कुमरे, स्वप्नील मडावी यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी देखील यात्रेत सहभागी होऊन अभिवादन केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बाबूराव शेडमाके यांच्या पराक्रमावर प्रकाश टाकला. “बाबूराव शेडमाके हे केवळ एका समाजाचे नसून संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत,” असे उद्गार यावेळी काढण्यात आले.
यावेळी कैलाश गेडाम, गौरव सिडाम, शहर महासचिव, हरीश गेडाम शहर संघटक, आकाश कुळमेथे शहर संपर्कप्रमुख, शहर निरीक्षक मोहित मसराम, शहर सोशल मिडिया प्रमुख श्रेयस पडोती, राकेश कुळमेथे, विशाल उईके, हिमांशु उईके,अक्षय वाढई, गणेश मेश्राम,राज डोंगरे,अनिकेत बांबोळे,साहिल गेडाम, शशिकांत गेडाम यांच्यासह संघटनेचे ईतर सदस्य उपस्थित होते.
