
आदिवासी विकास विभाग साखर झोपेत?
*- माजी जी. प. सदस्य क्रांती केरामी यांचा आरोप.*
*- मुख्याध्यापक व अधीक्षक व अधिक्षिका व विध्यार्थ्यांन सोबत चर्चा.*
कोरची – एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेला माजी जी. प. सदस्य क्रांति केरामी यांनी आपल्या चमू सह भेट दिली असता आदिवासी विभागाचे दुर्गम भागातील आश्रम शाळेकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. यावेळेस त्याना या शाळेची एकूण पटसंख्या 247 असून त्या पैकी मुलींची संख्या 110 व मुलांची संख्या 137 एवढी आहे. वर्ग 5 ते 7 वर्गात शिकविण्यासाठी एकही शिक्षक नाही, वर्ग 8ते 10 पर्यंत फक्त 3 शिक्षक आहेत. त्यामध्ये (मराठी, हिंदी, इंग्लिश) बाकी विषया साठी एकही शिक्षक नाही. साईन्स, गणित व अन्य विषय शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाही, वर्ग 1ते4 पर्यंत (वर्ग 2 साठी फक्त एकच शिक्षक उपलब्ध आहे.)
अशी परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच आश्रम शाळेची आहे. आज चा विध्यार्थी हा उद्याच भविष्य आहे असं आपण जेव्हा मनतो. परंतु आश्रम शाळेची परिस्थिती बघता. अगदी पायाच खचलेलं असे तर भिंत तर उभा आणि मजबूत कसा राहणार असाही प्रश्न निर्माण होतो. आदिवासी आमदार, खासदार, आदिवासी मंत्री व अधिकारी या गंभीर बाबी कडे लक्ष न देता ते स्वतःमध्येच खुश आहे त्यांना आदिवासी विध्यार्थीच्या शिक्षनाशी काही देण घेणं नाही असा भास होतो. या विध्यार्थीच्या वाली कुणीच नाही का असा प्रश्न मा.क्रांतिदादा केरामी यांनी केलेला आहे. आदिवासी समाजातील लोक आपल्या मुलांना तेथील कर्मचारी व आश्रम शाळेच्या विश्वासाने शिक्षण घ्यायला पाठवतात मात्र तिथं शिकवायला शिक्षक नाही. तर आदिवासी विध्यार्थी पुढे जाणार कसा आणि तो विकासाच्या मुख्य प्रवाहत येणार कसा असा प्रश्न क्रांती केरामी यांनी केलेला आहे. आदिवासी वसतिगृह आश्रम शाळेच्या व आदिवासी विध्यार्थी च्या शैक्षणिक विकासासाठी लाखो करोडोचा निधी येतो. परंतु तो पैसा जातो कुठे असा प्रश्न ही यावेळी केरामी यांनी उपस्थित केला. आदिवासी लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, मंत्री फक्त समाजाचा आरक्षण घेण्यासाठीच आहेत काय? या वर एकही आमदार, खासदार किंवा मंत्री विधानसभा, लोकसभेत प्रश्न मांडताना दिसत नाही. ही आदिवासी लोकप्रतिनिधीची शोकांतिकेची बाबा आहे. 15 ऑगस्ट मध्ये सर्व विध्यार्थीना शाळेचं ड्रेस असतो परंतु या वर्ष आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांना जुन्याच ड्रेस ने स्वातंत्र्य दिवस साजरा करावा लागलं. हे आदिवासी विध्यार्थी चा स्वतंत्र दिवस, टेंडर देणे करने हा विभागाचा मुद्दा आहे. शिक्षक आणि अन्य पद भरणे विभागाचा मुद्दा आहे. मग सत्र चालू होण्यापूर्वी आदिवासी विकास विभाग सर्व बाबीचा नियोजन का करत नाही. आज आश्रम शाळेत शिक्षक नाही जे शिक्षक आहेत ते कंत्राटी आहेत, त्यांना अजून पर्यंत ऑडर दिले नाही जे स्थानिक मुलांना शिक्षक म्हणून ऑर्डर दिले होते ते परत द्यायला पाहिजे होते परंतु अजून पर्यन्त नियुक्ती दिली नाही. स्वतःच्या मन मर्जी ने आदिवासी विभागाचा व अधिकाऱ्याचा कारभार सुरु आहे. प्रकल्प कार्यलायचे अधिकारी apo, po कर्मचारी येऊन भेटून जातात आम्ही हे करू म्हणून सांगतात मात्र 10 दिवस होऊनही परिस्थिती जैसे थे आहे. फक्त आश्वासन देणे आमदार, खासदार, ज्या पद्धतीने हे करू ते करू असे सांगून जातात त्याच स्टाईन ने आता अधिकारी व कर्मचारी बोलू लागले आहेत हे चालायल तरी काय यांचा अर्थ असा कि आमचे आमदार, खासदार, मंत्री अजिबात बोलत नाही. जे विषय विधानसभा व लोकसभेत प्रश्न मांडायला पाहिजे ते बोलत नाही आदिवासी विभागावर यांचा अजिबात ताबा नाही ते निष्क्रिय आहेत. म्हणून हे सर्व प्रश्न लोकप्रतिनिधीच्या कमजोर पणा मुळे निर्माण झाल्याचा आरोप क्रांती केरामी यांनी केलेला आहे येत्या 10 ते 20 दिवसात सर्व सोयी सुविधा जर प्रत्येक आश्रम शाळेत उपलब्ध झालें नाही तर ताला ठोको आंदोलन करण्यात येईल व सर्व पालक लोकांना घेऊन आदिवासी विकास प्रकल्प येथे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांना घेरावं करण्यात येईल व लोकप्रतिनिधी यांच्या घरा समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा क्रांती केरामी यांनी दिलेला आहे. सोबत सुकलू कोरेटी सर, भीमानंखोजी, रामलाल जाळे ग्यारापत्ती, प्रकाश मडावी कोरची आदी उपस्थित होते

