
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली.
गडचिरोली :-
- चामोर्शी गडचिरोली मार्गावरील पुलाचे काम अपूर्ण
- महामार्ग प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष ,
- पोहर नदी व शिवनी नदी वरील पुलाचे काम रखडले
- चामोर्शी मार्गावर असलेल्या पोहर नदीजवळ रस्त्याआड मोठा मोठे खड्डे पडले असून अनेकदा वाहने रस्त्यावर अडकली दिसून येत असल्याने वारंवार वाहतूक प्रभावित होत असते. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोहर नदीजवळ असलेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहे,सोबतच शिवणी जवळ असलेला मोठ्या पुलाचे बांधकाम अजूनपर्यंत अपूर्ण असून त्यात सुद्धा ये जा करण्यासाठी सध्या मोठी रांगच वाहनधारकांना लावावी लागत आहे,त्यात रस्ते इतके खड्डेमय झाले असून त्या पुलाला कटघरे नसून वाहन नेण्यास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तरी सुद्धा प्रशासनाचे व संबंधित कंत्रातदाराचे याकडे अजिबात लक्ष्य नाही “जनता त्रस्त प्रशासन मस्त “अशी हालत झालेली आहे.
पोहर नदीवर असलेल्या ठेंगणा पूल वारंवार बुडत असल्याने मोठ्या पुलाची शेजारी निर्मिती करून वर्ष लोटले तरी पुलावरू

वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही ,शेकडो ट्रक जाऊन रस्ता हा खड्डेमय झाला असून ये जा करण्यास तारेवरची कसरत वाहन धारकांना करावी लागत आहे. पुलाच्या समोरील भागातील रस्त्याचे काम अर्धवट वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे बरीच वाहने जुन्या पुलावरून जात असतात. दिवसभर या पुलावरून वाहनांची
वर्दळ असते. रत्याअभावी या मार्गावरून ये-जा करणे वाहनधारकांना अडचणीचे जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे.
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

