News Jagar

सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
- जिल्ह्यात डेंगू व टॉयफॉईड चा कहर ,प्रशासन झोपेत.
- आरोग्य अधिकारी कार्यालय व जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालय ला कुलूप ठोकण्याचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा इशारा.
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे मूलचेरा तालुक्यातील लगामयेल्ला परिसरातील मागील 20 दिवसापासून डेंग्यू चा उद्रेक झाला असून 15 अगस्ट 2025 रोजी काकरगटता गावात आणखी 1 महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे डेंगू बळीची संख्या 5 वर गेली आहे,सध्या या परिसरात शंभरहून अधिक रुग्ण आहेत,जिल्ह्यात डेंगू ,मलेरिया,आणि टॉयफॉईड या साथीच्या रोगांनी भीषण स्वरूप धोरण केले आहे,गावागावात डासांचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे,या आजारामुळे शेकडो नागरिक आजारी पडले असून अनेकांचे जीव धोक्यात आहे,लहान मुले,महिला ,वृद्ध यांना आजाराचा फटका बसत आहे,रुग्णालयात रुग्णाची संख्या वाढत आहे,प्रचंड गर्दी असून औषधी,खाट, डॉक्टर व उपचार याची तीव्र कमतरता जाणवत आहे,या गंभीर परिस्थितीकडे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्णपणे दुर्लक्ष्य केले असून संपूर्ण प्रशासन झोपेत आहे,अशे आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.
लोक आजारी पडत आहे,मृत्यूच्या दारात आहेत तरी अधिकारी AC रूम मध्ये बसून खुर्च्या गरम करत आहेत.

काँग्रेसचे मागणी
- प्रत्येक गावात मोफत शिबीर घेऊन तपासणी करण्यात यावी.
- डासासाठी हफत्याला फवारणी करण्यात यावी
- अतिरिक्त दवाखान्यात खाट, डॉक्टर व औषधी चा मोफत पुरवठा करणे.
- फिरते पथक नि प्रत्येक गावात जनजागृती मोहीम राबवावी.
- रक्त तपासणी करून त्वरित रीपोर्ट देण्यात यावे
- रक्त शिबिरे घेऊन रक्तसाठा वाढवावा, जेणेकरून प्लेटलेट्स कमी झाल्या रुग्णांना कमतरता भासणार नाही.
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

