
सोनू वाळके, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
प्रेस नोट
सिरोंचा व अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पद रिक्त – स्थानिकांना प्राधान्य देऊन कंत्राटी नियुक्तीची मागणी

आजाद समाज पार्टीचे सीईओ सुहास गाडेना निवेदन.
गडचिरोली – सिरोंचा व अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात आजाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सिरोंचा व अहेरी परिसरात शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढा अध्यापन वेळ मिळत नाही. हा प्रश्न विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गंभीर स्वरूपाचा असल्याने तातडीने कंत्राटी शिक्षक नियुक्त करणे अत्यावश्यक आहे.
तसेच, नियुक्ती करताना स्थानिक पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळेल आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या सतत उपस्थितीचा लाभ होईल.
या वेळी आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, गडचिरोली तालुका सहसचिव मोसम मेश्राम, सिरोंचा येथील राजेश चकणारपवार, सतीश मलाया बुरम, किशोर भिमाया ठोकला, श्रीकांत आठवले, नितेश बनकर, अमोल कंकणालवर, किशोर नैताम आदी युवक उपस्थित होते.
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

