
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे भरती विद्यार्थ्यांची आजाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट व संवाद
—————————————-
अनंतपूर आश्रम शाळा येथील घटना

चामोर्शी :- तालुक्यातील अनंतपूर येथील वसंतराव नाईक आश्रम शाळेत आरोग्य पथकाने दिलेल्या गोळ्या खाल्ल्यानंतर मंगळवारी सुमारे 47 विद्यार्थ्यांची तब्येत अचानक बिघडली. उलट्या, मळमळ व ताप अशी लक्षणे दिसल्याने विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण व सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आजाद समाज पक्षाचे जिल्हा महासचिव प्रकाश सहारे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड आणि तालुका उपाध्यक्ष राहुल कुकुडकर यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची व शिक्षकांची विचारपूस केली. सुदैवाने सर्वांची प्रकृती आता चिंतेच्या बाहेर असून काहींना डिस्चार्जही देण्यात आला असे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. अशा घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने त्वरित चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी सर्वांची अपेक्षाआहे.
————————————–
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

