
चामोर्शी : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा अ.भा.आ.वि. परिषद गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त आज अ.भा.आ.वि. परिषदच्या महिला शाखेकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सकाळपासूनच डॉ. होळी यांच्या निवासस्थानी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली.
यावेळी विकास परिषदेच्या महिला शाखेच्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची आठवण काढत अनेकांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विविध गावांमधून आलेल्या विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. होळी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून दीर्घायुष्य व उत्तम स्वास्थ्याच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी अनेकांनी संदेश, कॉल व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छांचा वर्षाव केला. डॉ. होळी यांनी सर्वांचे आभार मानत लोकसेवा हीच आपली प्रामाणिक बांधिलकी असल्याचे सांगितले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. यावेळी पुष्पालता कुमरे महिला जिल्हाध्यक्ष गडचिरोली, विद्या दुग्गा जिल्हा सचिव, स्मिता नैताम जिल्हा संघटिका, रेखा तोडासे जिल्हा सहसचिव, लिना कोकोडे तालुका अध्यक्ष गडचिरोली, शशिकला तोर्रेम तालुका अध्यक्ष अहेरी, सुषमा गेडाम तालुका अध्यक्ष चामोर्शी, जया सयाम तालुका संघटिका वडसा, गीता सिडाम तालुका उपाध्यक्ष चामोर्शी, आरती कोल्हे शहर अध्यक्ष गडचिरोली, मालता पुडो, शालिनी पेंदाम, निकिता कुमरे, तनुजा कुमरे, प्रीती सिडाम, वंदना अलाम, अलिना मडावी, प्रियांका कुळमेथे, सुशीला गेडाम, मेघा मडावी, दीपाली आत्राम, पूजा गेडाम, मंगला गेडाम, बायजाबाई सिडाम, माधुरी सिडाम, शेवंता सिडाम, राधिका मित्तलवार, रीना येलमुले आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.


