Accidental death of Teacher Mamta Bambole

रुपेश सलामे , गडचिरोली प्रतिनिधी
कारमेल शाळेच्या शिक्षिका कु. ममता बांबोळे वय ४३ या दि . १ ० डिसेम्बर रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकी वाहणाने आपल्या कर्तव्यावर शाळेत जात असताना बी फॅशन प्लाजा समोर गडचिरोली- चंद्रपूर रोडवर त्यांची स्कुटी गाडी स्लीप होऊन खाली पडल्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या पाठीमागच्या चाकाखाली येऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्यांना शासकीय वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.Accidental death of Teacher Mamta Bambole

