
लोकशाहीप्रती निष्ठा: काटोलमध्ये नवविवाहित वधू नम्रता निळकंठराव टेकाडे यांचे कर्तव्यपूर्तीचे उदाहरण
काटोल (प्रतिनिधी): एका अत्यंत प्रेरणादायी घटनेत, काटोल शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये एका नवविवाहित वधूने आपल्या शुभविवाहाच्या दिवशीही मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही मूल्यांप्रती आपली अढळ निष्ठा सिद्ध केली. कुमारी नम्रता निळकंठराव टेकाडे यांचा विवाह आजच काटोल येथे संपन्न झाला, मात्र मतदानापासून वंचित राहण्याची खदखद त्यांच्या मनात होती.
पतीच्या सहकार्याने केली कर्तव्यपूर्ती नम्रता निळकंठराव टेकाडे यांनी तत्काळ आपल्या नवविवाहित पतीला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जाण्याची विनंती केली. पतीनेही त्यांची ही विनंती तत्काळ मान्य केली आणि नवविवाहित वधूसह ते मतदान केंद्राकडे रवाना झाले.

यावेळी वधू नम्रता निकटराव यांनी काटोल येथील ज्योतिबा फुले अध्यापक विद्यालय, पंचवटी येथील मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा अमूल्य अधिकार बजावला. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा सन्मान करण्याच्या त्यांच्या या कृतीचे उपस्थित सर्व मतदारांनी कौतुक केले. newsjagar
यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य समीरजी उमप, माजी नगरसेविका लता कडू, भूषण भोयर, मनोज काळे, अतुल राऊत, रोशन भोयर यांच्यासह इतर मतदार उपस्थित होते. नम्रता निळकंठराव टेकाडे यांच्या या कृतीने विवाह समारंभ आणि लोकशाही कर्तव्य यांचा समन्वय साधत इतरांसाठी एक आदर्श घालून दिला आहे.

