
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कोरची येथे
विद्यार्थी हितगुज कार्यक्रम संपन्न
शिक्षकांनी विद्यार्थी हित लक्षात ठेवून व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी नेहमी प्रयत्नशील राहून स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कसा टिकेल याकडे लक्ष देऊन शिक्षकांनी कार्य करत राहावे असे प्रतिपादन संस्था सहसचिव तथा प्राचार्य नागेश्वर फाये यांनी केले

ते आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कोरची येथे विद्यार्थी हितगुज कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव दोषहरराव फाये,प्राचार्य नागेश्वर फाये,सेवानिवृत्त प्राचार्य घनश्याम सोनुले, शिक्षक हेमंत भुसारी प्रा. प्रदीप पाटणकर, प्रा. विनोद नागपूरकर सेवानिवृत शिक्षक नरहरी माकडे इत्यादी उपस्थित होते .
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. विनोद नागपूरकर यांनी भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त आपला संविधान आपला आपला अभिमान याप्रसंगी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व पटवून दिले.
यावेळी घनश्याम सोनुले यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. newsjagar

कार्यक्रमाचे संचालन देविदास हटवार यांनी केले तर आभार हेमंत भुसारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीराम विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थ्यां उपस्थित होते.

